अकोले , ता . १६: मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी विधानसभेत राज्यातील जुन्या मंदिरांचे जतन करण्याचे काम करण्याची घोषणा केली. त्यासाठी आर्थिक तरतूद केली जाईल असे म्हटले आहे.त्यांचे याबाबत अभिनंदन.मात्र तालुक्यातील हरीशचंद्रगड , अमृतेश्वर मंदिर ,टाहकरी मंदिराचे त्यात समावेश करून या मंदिरांचे शुशोभीकरण करावे. अशी मागणी माजी आमदार वैभव पिचड यांनी केली आहे .
याबाबत मुख्यमंत्री याना तातडीने पत्रही पाठविले आहे . पुरातन वास्तूचे जातं व संवर्धन करणे जबाबदारी राज्य पुरातत्व विभागाची आहे . हजारो वर्षाच्या वास्तूचे कालावधी लक्षात घेऊन शास्र शुद्ध संवर्धन आवश्यक असते . या नियमाला डावलून पुरातत्व खाते केवळ भेगा पडलेल्या दगडी चिऱ्यांना सिमेंट चोपडण्याचे काम करीत आहे . त्यामुळे ऐत्यासिक वास्तूंच्या सौंदर्याला बाधा पोहचवत आहे .गड किल्ले , पुरातन मंदिरे आणि धर्मशाळा यांचे जतन करण्याचे व संवर्धन करण्याचे काम व जबाबदारी पुरातत्व विभागाला जिकरीचे वाटते नव्हे तर ते याबाबीकडे दुर्लक्ष्य करत आहेत. अनेक दुर्ग प्रेमींच्या भावना या गड किल्ल्यात व मंदिरात दडलेल्या आहेत . मात्र वर्षानुवर्षे या वास्तूकडे दुर्लक्ष्य केले जाते आहे . रस्ते बांधणी ठेकेदाराला ठेका देऊन हि कामे काही अंशी उरकली जातात त्यामुळे प्राचीन वास्तूची रया जाते . पुरातत्व अधिकाऱ्यांचा स्थापत्य शैलीचा अभ्यास नसल्यास संवर्धनानंतर या वस्तू बेढब दिसतात हरीशचंद्रगड , अमृतेश्वर मंदिर , टाहाकारी मंदिर हेमाडपंथी शैलीतील मंदिरे आणि दीपमाळ , बुरुज , कोसळण्याच्या स्थितीत आहेत . तर अतिवृष्टीच्या काळात हि मंदिरे गळतात मंदिराचे दगड सरकली आहेत . पुरातत्व खाते स्थानिकांना यात हस्तक्षेप करू देत नाही त्यामुळे या वास्तू मोडकळीस आल्या असून हरीशचंद्रगडा वरील विठ्ठल रुख्मिणी मातेची मूर्ती चोरीला जाऊनही पुरातत्व खाते साधी चौकशी व पोलीस केस करत नाही त्या अर्थी त्यांना या वास्तूबद्दल आत्मीयता नाही . गिरीप्रेमींनी , स्थानिक ग्रामस्थांनी आपणाकडे याबाबत ओरड केली असून याची मुख्यमंत्री यांनी चौकशी करून या वास्तूंचे खास बाब म्हणून निधी उपलब्ध करून जतंन करावे व तातडीने हरीशचंद्र गड , अमृतेश्वर मंदिर , टाहाकारी मंदिर दुरुस्तीसाठी व सुशोभीकरणासाठी मुख्यमंत्री व अर्थ मंत्री यांनी निधी उपलब्ध करून द्यावा अशी जोरदार मागणी माजी आमदार वैभव पिचड यांनी केली आहे . 

