अमेरिका-इराण तणाव वाढला: होर्मुझ सामुद्रधुनीवरून डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी

USA war with Iran यांच्यातील तणाव पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष Donald J. Trump यांनी इराणमधील परिस्थितीबाबत कठोर इशारा दिला आहे.


ट्रम्प यांच्या मते, अमेरिका सध्या इराणमध्ये सुरू असलेल्या लष्करी कारवाया थांबवण्यासाठी नव्या आणि अधिक समंजस शासनाशी चर्चा करत आहे. या चर्चेत मोठी प्रगती झाली असल्याचे त्यांनी सांगितले.


मात्र, जर लवकरच करार झाला नाही आणि Strait of Hormuz तात्काळ “ओपन फॉर बिझनेस” झाला नाही, तर अमेरिका इराणमधील वीज निर्मिती केंद्रे, तेल विहिरी आणि Kharg Island यांसह महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर मोठी कारवाई करू शकते, असा इशारा त्यांनी दिला.


ट्रम्प यांनी सांगितले की, ही कारवाई इराणच्या जुन्या शासनाच्या ४७ वर्षांच्या कारकिर्दीत अमेरिकन सैनिक आणि नागरिकांवर झालेल्या हल्ल्यांच्या बदल्यात केली जाईल.


आंतरराष्ट्रीय स्तरावर या विधानामुळे तणाव वाढण्याची शक्यता असून, जागतिक तेल व्यापारावर याचा परिणाम होऊ शकतो.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,800SubscribersSubscribe

Latest Articles