Ashti mahavitaran acb trap 18 हजारांची लाच घेताना महावितरणची महिला अधिकारी एसीबी च्या जाळ्यात

आष्टी

Ashti mahavitaran acb trap आष्टी येथील महावितरण कार्यालयातील सहायक अभियंता कोमल शिंदे यांना १८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले.

राज्यात एकीकडे नैसर्गिक ऊर्जा स्रोतांचा वापर करून वीज निर्मिती करण्याचा प्रकल्पांना प्रोत्साहन देत असताना महावितरण मधील काही अधिकारी नागरिकांच्या आणि शेतकऱ्यांच्या अनुदानावर डल्ला मारण्याचा प्रयत्न करत आहेत.

तक्रारदाराच्या सोलर प्रकल्पाचे पडताळणी करून देण्यासाठी कोमल अर्जुन शिंदे यांनी मोबदल्याच्या स्वरूपात १८ हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने याबाबत बीड च्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी)कडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी करून एसीबीने सापळा रचला. दरम्यान, मंगळवारी तक्रारदाराकडून १८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना सहायक अभियंता कोमल शिंदे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली. ही कारवाई बीड एसीबीचे उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले यांच्यासह त्यांच्या पथकाने केली. या घटनेमुळे महावितरण विभागात खळबळ उडाली असून पुढील तपास एसीबीकडून सुरू आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,800SubscribersSubscribe

Latest Articles