१३ कोटी ७० लाखांच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी चौकशी समितीचा अहवाल
आमदार विजयसिंह पंडित यांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती
बीड
महावितरणच्या बीड विभागीय कार्यालयातील देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी आलेल्या १३ कोटी ७० लाख रुपयांच्या निधी वाटपातील कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सहा अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. आमदार विजयसिंह पंडित यांनी २५ ऑगस्ट २०२६ रोजी पुराव्यांसह केलेल्या तक्रारीनंतर महावितरणने चौकशी समिती नेमली होती. समितीच्या अहवालानंतर मुख्यालयाने ही कारवाई केली.
कार्तिकी वारीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडूनपंढरपूरातील सुविधांची पाहणी
निलंबित अधिकाऱ्यांमध्ये अधीक्षक अभियंता प्रेमसिंग राजपूत, कार्यकारी अभियंता सुबोध डोंगरे, उपकार्यकारी अभियंता श्याम मोरे, सहाय्यक अभियंते शाम कुंभार व चंद्रकांत प्रधान आणि कनिष्ठ अभियंता महेंद्र गुंजाळ यांचा समावेश आहे.
निधी वाटपात संगनमताने गैरव्यवहार आणि २० ते २५ टक्के लाच घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. अधीक्षक अभियंता नितीन काळे आणि कार्यकारी अभियंता सुनील पात्रा यांच्या समितीने स्थळपाहणी व तांत्रिक तपासणी करून अहवाल सादर केला. दरम्यान, अपहाराची रक्कम वसूल करून दोषींविरुद्ध गुन्हे दाखल करावेत, यासाठी हिवाळी अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचे आमदार पंडित यांनी बीड येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले.
