बीड (प्रतिनिधी )
बीड तालुक्यातील बालाघाट परिसरातील पुरातन मठ अशी ओळख असणाऱ्या श्री संत तुकाविप्र महाराजांच्या पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान दिंडीचालक ह.भ.प.अर्जुन महाराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या उत्साहात श्रीक्षेत्र पंढरपूरकडे झाले असून संत नामदेव,संत तुकाराम ते संत तुकाविप्र महाराज अशी अध्यात्मिक परंपरा जोपासणाऱ्या या संत परंपरेला व त्यांच्या शतकोटी अभंग मालिकेला मानणारा मोठा वर्ग महाराष्ट्रसह संपूर्ण भारतभर आढळतो दिंडी चालक अर्जुन महाराज पाटील यांनी वयाची पंच्याहत्तरी पार केली असून साधी राहणी,संत तुकाविप्र महाराजांप्रति अपार श्रद्धा व गेली 25 वर्षापासून अंजनवती ते पंढरपूर व पैठण असा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करतअखंडपणे सुरू ठेवलेला दिंडी सोहळा त्यामुळे अंजनवती पंचक्रोशीसह संपूर्ण बीड जिल्ह्यातील वारकरी संप्रदायावर नितांत श्रद्धा असणाऱ्या नागरिकांकडून त्यांचे विशेष कौतुक करण्यात येत आहे सदरील दिंडीमध्ये ग्रामस्थांसह बीड,केज, पाटोदा,कळंब,जामखेड,वाशी,भूम, परंडा आदि तालुक्यांमधून मोठ्या संख्येने वारकरी सहभाग नोंदवतात.