भारतीय नौदल ‘मालवण’ ही पाणबुडी विरोधी उथळ पाण्यातील अत्याधुनिक युद्धनौका आपल्या ताफ्यात समाविष्ट करण्यासाठी सज्ज

Anti-Submarine Warfare Shallow Water Craft भारतीय नौदल 22 जुलै रोजी ‘माहे’ श्रेणीतील पाणबुडीविरोधी उथळ पाण्यातील दुसरी युद्धनौका  ‘मालवण‘ (ASW-SWC) आपल्या ताफ्यात दाखल करणार आहे.

हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह यांच्या अध्यक्षतेखाली, पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ व्हाईस ॲडमिरल संजय वत्सायन यांच्या उपस्थितीत हा समारंभ होणार आहे. इतर वरिष्ठ नौदल अधिकारी, कोची येथील कोचीन शिपयार्ड लिमिटेडचे प्रतिनिधी, माजी सैनिक आणि मान्यवर अतिथी यावेळी उपस्थित राहतील.

कोची येथील कोचीन शिपयार्ड लिमिटेडमध्ये बांधलेली ‘मालवण‘ ही नौका, आधुनिक नौदल जहाजबांधणी आणि रचनेतील ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेचे प्रतीक आहे. ही नौका 80 टक्क्यांहून अधिक स्वदेशी सामग्री असलेली असून युद्धनौकांची रचना, बांधकाम आणि एकात्मतेमधील भारताच्या वाढत्या प्रभावाचे उत्तम उदाहरण आहे.

आकाराने लहान, पण तरीही शक्तिशाली असलेली ही नौका चपळता, अचूकता आणि टिकाऊपणा दर्शवते. स्वदेशी ‘मालवण’चा नौदलात होणारा समावेश,  अत्याधुनिक आणि उथळ पाण्यातील युद्धनौकांचा ताफ्यात समावेश करण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,800SubscribersSubscribe

Latest Articles