सोलापूर जिल्ह्यातील कोरवली येथील विहिरीत आढळली महाकाय मगर…

solapur


solapur crocodile found मोहोळ तालुक्यातील कोरवली येथील बाबू दादा जमदाडे यांच्या शेतातील विहिरीत महाकाय मगर आढळून आल्याची घटना बुधवारी घडली आहे. ती मगर सातत्याने विहिरीच्या बाहेर येण्याचा प्रयत्न करित होती मात्र ते शक्य नव्हते त्यामुळे जमदाडे कुटुंबियानी प्रशासनाला संपर्क साधून घटनेची माहिती दिली. यावेळी वन विभागाची रेस्क्यु टिम घटनास्थळी पोहचली असली तरी बुधवारी रात्री अंधार पडल्याने रेस्क्यु करणे शक्य झाले नाही.

कोरवली येथील जमदाडे यांच्या शेतातील जुन्या विहिरीत सातत्याने या मगरीच्या हालचाली दिसून येत होत्या. मात्र पाण्यात स्पष्टपणे ती मगर आहे की घोरपड हे दिसून येत नव्हते. त्यामुळे जमदाडे कुटुंबाने त्याकडे दुर्लक्ष केले होते. बुधवारी मात्र ही मगर विहीरी बाहेर येण्यासाठी धडपडत होती. मात्र विहीरीत झाड पडले आहे. त्यामुळे मगरीला वन येणे शक्य नव्हते. त्यामुळे काही टप्यावर येवून ती शांत बसली होती. ही घटना बाबू जमदाडे यांनी पाहिल्यानंतर त्यांनी ही माहिती कुटुंबाली दिली तसेच प्रशासनाला या घटनेची कल्पना दिली. त्यानंतर वन विभागाची टिम घटना स्थळी तातडीने दाखल झाली असली तर बुधवारी पाऊस पडल्याने तसेच विहिरीच्या आजूबाला खूप आडचण असल्याने रेस्क्यु करण्यास आडचणी येत होत्या. त्यामुळे वन विभागाच्या टिमने सापळा लावला असून त्याचे रेस्क्यु गुरुवारी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

कोरवली येथील जमदाडे यांच्या शेतातील विहीरीत मगर आढळून आल्याचे समजले आहे. त्या ठिकाणी रेस्क्यु टिम पाचारण करण्यात आली आहे. त्या मगरीला सुखरुप पकडून निसर्गात सोडण्यात येणार आहे.

  • योगेश घोडके, वन परिक्षेत्र अधिकारी मोहोळ

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,800SubscribersSubscribe

Latest Articles