मुंबई:
37th international biology olympiad india 3 gold medals ३७ व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड २०२६ स्पर्धेत भारतीय संघाने एक सुवर्ण आणि तीन रौप्य पदके पटकावली. लिथुआनियातील विल्नियस येथे ३७ व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड २०२६ (International Biology Olympiad – IBO 2026) स्पर्धा १२ ते १९ जुलै २०२६ कालावधीत आयोजित करण्यात आली होती.
भारतीय संघातील हरियाणाच्या भाव्या गुंवालला सुवर्णपदक, पश्चिम बंगालच्या सौमिल मैती, राजस्थानच्या निशित कलानी आणि पंजाबच्या अनमोल कुमार यांना रौप्य पदके मिळाली. यंदाच्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये ७८ देशांतील ३०७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत ३१ सुवर्ण, ६१ रौप्य आणि ९१ कांस्यपदके देण्यात आली.
भारतीय संघासोबत होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र- टाटा मूलभूत विज्ञान संस्थेचे निवृत्त प्रा. रेखा वर्तक आणि होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र- टाटा मूलभूत विज्ञान संस्थेच्या डॉ. अनुपमा रोनाड हे संघप्रमुख होते. बडोदाच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठाचे डॉ. रणजितसिंह देवकर आणि मुंबईच्या यूएम-डीएई सेंटर ऑफ एक्सलन्स इन बेसिक सायन्सेस डॉ. सिद्धेश घाग यांनी वैज्ञानिक निरीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली.

