नाशिक शहरातील मराठी शाळांसाठी नाशिक महापालिकेने घेतला हा निर्णय


नाशिक:

nashik mahapalika decision for marathi school मराठी शाळा टिकाव्यात यासाठी नाशिक महापालिकेने नाशिक शहरातील सर्व शाळांची घरपट्टी माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.

नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके यांनी आज पत्रकारांना ही माहिती दिली. मराठी माध्यमांच्या शाळांना इंग्रजी शाळांशी मोठी स्पर्धा करावी लागत आहे. मराठी भाषेला एकीकडे अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असताना दुसरीकडे मराठी शाळांची अवस्था बिकट होत आहे.

त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे महापौर हिमगौरी आडके यांनी सांगितले. शहरातील अनुदानीत आणि विनाअनुदानीत अशा एकूण साडे तीनशे शाळांना याचा लाभ मिळणार आहे.

शहरातील मराठी शाळांना घरपट्टीत सवलत मिळावी यासाठी शहर शिक्षण संस्थाचालक संघटनेचे अध्यक्ष ॲड. मनोज पिंगळे यांनी महापौर आणि उपमहापौरांना निवेदन देऊन मागणी केली होती.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,800SubscribersSubscribe

Latest Articles